विरारमध्ये एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालेला आहे. विरार मधल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी रात्री चाळीवर कोसळला होता. इमारतीमधल्या ५० पैकी १२ सदनिका यात कोसळल्या असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुुटुंबांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या इमारतीला मे महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस दिली होती, मात्र लोकांनी ते गांभीर्याने घेतलं नाही, असं फडनवीस म्हणाले.
आतापर्यंत ९ जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढलंय. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.