November 1, 2024 9:41 AM | PM Narendra Modi

printer

आपलं सरकार एक इंच जमीनिसाठीदेखील तडजोड करणार नाही- प्रधानमंत्र्यांचा निर्धार

गुजरातमधील कच्छ येथील खाडी भागातील लक्की नाला इथे काल प्रधानमंत्री, सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. सीमेवरील एक इंच जमीनिसाठीदेखील कोणतीही तडजोड न करणारं सरकार आज सत्तेत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

 

या सरकारची धोरणं, सशस्त्र दलांच्या निश्चय आणि उद्दिष्टाशी सुसंगत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सशस्त्र दलांतील जवानांच्या दुर्दम्य इच्छाशक्तिची आणि साहसाची पंतप्रधान मोदी यांनी यावेळी प्रशंसा केली. भारतीय जवानांनी नेहमीच प्रत्येक आव्हानाला समर्थपणे तोंड देत स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी या खाडीतील तरंगत्या सीमा चौकीला भेट देऊन तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्याना मिठाई वाटून दिवाळी साजरी केली.