Oscars 2026: निवडक १५ चित्रपटांमधे ‘होमबाऊंड’ चित्रपटाचा समावेश

ऑस्कर २०२६ अर्थात ९८व्या अकॅडेमी पारितोषिकांसाठीच्या अंतिम फेरीत होमबाऊंड  हा भारतीय चित्रपट प्राथमिक फेरी पार करून निवडक  पंधरा चित्रपटांच्या यादीत पोचला आहे.  नीरज घायवान दिग्दर्शित  हा  भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या  श्रेणीत  आहे.  या यादीतल्या चित्रपटांचं अंतिम नामांकन २२ जानेवारीला जाहीर होईल. ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा १५ मार्च २०२६ रोजी होणार आहे.