ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन कीटन यांचं काल कॅलिफोर्नियामध्ये निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. १९७७ सालच्या ‘अॅनी हॉल’ या चित्रपटातली ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका आणि ‘द गॉडफादर’ या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. कीटन यांनी ६०पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘समर कॅम्प’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
कीटन यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. यामध्ये १९९५ सालच्या ‘अनस्ट्रंग हिरोज’ या चित्रपटाची कॅन चित्रपट महोत्सवातल्या ‘अन सर्टन रिगार्ड’ श्रेणीमध्ये निवड झाली होती.