डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय स्तरावरील रबी कृषी संमेलनाचं आयोजन

राष्ट्रीय स्तरावरील रबी कृषी संमेलनाचं उद्घाटन केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आहे. केंद्रिय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर हे ही यावेळी उपस्थित राहतील. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आधारित पद्धतींमध्ये सहकार्य आणि नाविन्याला चालना देणं हा या परिषदेचा उद्देश आहे. तसंच आगामी रब्बी हंगामासाठी कोणते उपक्रम राबवले जाऊ शकतात आणि त्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी विविध मंत्रालयं, राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि संघटनांचं प्रतिनिधी एकत्र येतील