सिंधुदुर्गात चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या सहयोगानं आणि दायती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी यांच्या आयोजनातून आज आणि उद्या ठाकरवाडी म्युझियममध्ये चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चं आयोजन करण्यात आल आहे.चित्रकथी या कला प्रकाराला घेऊन आयोजित होणारा महोत्सव हा इतिहासातला पहिलाच महोत्सव असून हा महोत्सव दोन दिवस चालणार आहे.

 

 

नामवंत चित्रकथी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. तसेच रामायण आणि चित्रकथी परंपरा यावर चर्चासत्र सुद्धा होणार आहे. ठाकर आदिवासी कलाकारांची चारशे वर्षांची परंपरा असलेली ही चित्रकथी. यामध्ये चित्राच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या मंदिरात दसऱ्याच्या कालावधीत दहा दिवस एक कथा चित्राच्या माध्यमातून सादर केली जाते. टाळ, तंबोरा, डमरू या वाद्यांची साथसोबत संपूर्ण रात्र असते. अशा दहा रात्री हे कथाकथन चालतं. ही कला सादर करणाऱ्या कलाकारांना बावलेकर म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरीसाठी सुद्धा या चित्रकथीचा वापर केला जायचा. पहिल्यांदाच होत असलेल्या या महोत्सवात वैशिष्टपूर्ण अशी चित्रकथी परंपरा, पाहायला मिळणार आहे. या महोत्सवात 14 ते 15 चित्रकथी सादर करणारे कलाकार सहभागी होणार असून कोकणातील ही पारंपरिक अशी पुरातन कला रसिकांसमोर सादर करणार आहेत.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.