डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात मौसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दक्षिण भारतातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकत असल्यानं कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मुंबईतल्या बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड या उपनगरात दक्षिण मुंबईच्या तुलनेनं अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी सातारा जिल्ह्यात तसंच पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची तर छत्रपती संभाजी नगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली नांदेड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असं हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा ब्रह्मपुरी – वडसा मार्गावरचा भूती नदीवरचा पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.