मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मतदार यादीतल्या त्रुटीकडे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाचं सातत्याने लक्ष वेधत आहे. मात्र निवडणूक आयोग विरोधकांच्या मागण्यांची दखल घेत नाही, मतदार यादीत कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नाहीत असं आयोगाचं म्हणणं आहे, त्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचं राऊत म्हणाले. मुंबईतल्या मोर्चात राज्यभरातून लोक येतील, या मोर्चात ज्येष्ठ नेते शऱद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे सहभागी होतील, असं राऊत यांनी सांगितलं.
Site Admin | October 19, 2025 8:26 PM
मतदार यादीतल्या त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मोर्चा