संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेत बैठक घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, सीपीआय एम, सीपीआय यासह विविध पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण संदर्भात तसंच, संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी या बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, नवीन कामगार कायद्यांना विरोध करत विविध पक्षांच्या नेत्यांनी आज संसद भवनाबाहेर निदर्शनं केली. कामगार कायद्यातल्या तरतुदी कामगार हिताच्या विरोधी असून त्या मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.