विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनात कपात

आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी केलेलं निलंबन तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेेनं आज एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. 

 

विधानपरिषदेतल्या निवृत्त सदस्यांना आज निरोप देण्यात आला. वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक वाढवण्याचं काम या सदस्यांनी केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. येणाऱ्या सदस्यांना या सदस्यांचं काम कामकाजाच्या नोंदीद्वारे अभ्यासता येईल आणि यातून प्रेरणा मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. विधानपरिषदेतले विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल  पाटील, अनिल परब, महादेव जानकर, मनिषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, मिर्झा वजाहत, प्रज्ञा सातव, जयंत पाटील या सदस्यांना निरोप देण्यात आला.