डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारनं आपल्या शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात २५९ शासन निर्णय प्रसिद्ध केले. तसंच २७ महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्या या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, असं पत्र दानवे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केलं आहे