डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आसाममध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू

आसाममधे दिमा हसाओ जिल्ह्यात उमरंगसो इथं कोळशाच्या खाणीत अडकलेल्या ९ खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी लष्करानं राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलबरोबर संयुक्त मोहीम सुरू केली आहे. आसाम सरकारनं नौदलाचे पाणबुडे मागितले आहेत. बचावकार्याची पाहणी करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यानं तातडीनं घटनास्थळी पोहोचवं, असे निर्देश आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिले आहेत.
गुवाहाटीपासून २५० किमी अंतरावर मेघालय सीमेजवळ ही बेकायदेशीर कोळसा खाण आहे. ३०० फूट खोल असलेलया या खाणीत पाणी शिरल्यामुळे कामगार अडकले आहेत.
राष्ट्रीय हरित लवादानं २०१४ मध्ये बंदी घातली असली तरी आसाममध्ये अवैधरित्या खाणकाम सुरू असून दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.