डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान, आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भाजपातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरु आहे. २३ मेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. 

 

गुजरातमधे मोतीबाग टाऊन हॉल पासून शहीद मेमोरियलपर्यंत काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेला केंद्रीय मंत्री निमुबेन बांभनिया यांनी झेंडा दाखवला. राज्याचे मंत्री हर्ष संघवी गांधीनगर इथल्या तिरंगा यात्रेत सहभागी झाले. जामनगरमधे ८ किलोमीटर लांबीची मिरवणूक काढण्यात आली. 

 

जम्मू-कश्मीरमधे श्रीनगर इथं काढलेल्या तिरंगा यात्रेचं नेतृत्व भाजपा नेत्या आणि जम्मू-कश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्ष दारक्षण अंद्राबी यांनी केलं. तर अनंतनाग इथं सोफी युसूफ यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. 

 

पंजबामधे जालंधर इथं, तर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात अंबाजोगाई आणि परळी, तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव इथंही आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं.