डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या इच्छाशक्तीचं प्रतीक – संरक्षणमंत्री

ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नसून ती देशाची राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक ईच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ही कारवाई दहशतावादाविरोधातल्या भारताच्या जबरदस्त इच्छाशक्तीचं तसंच लष्करी क्षमता आणि दृढनिश्चयाचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. लखनऊ इथं ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं उद्घाटन काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून झालं; त्यावेळी ते बोलत होते.