डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ऑरपेशन सिंदूर स्थगित, मात्र दहशतवादाशी लढा सुरूच राहील – प्रधानमंत्री

भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केलं आहे; ते थांबवलेलं नाही, दहशातवादाविरुद्धची लढाई चालूच राहील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. दहशतवादाला खतपाणी घालणारं सरकार आणि दहशतवादी संघटना वेगवेगळ्या नसून पाकिस्तानच्या हालचालींवर  भारताचं लक्ष आहे असं त्यांनी सांगितलं.

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं; त्यानंतर प्रथमच प्रधानमंत्र्यांनी काल राष्ट्राला संबोधित केलं. एकीकडे प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षिततेबाबत आश्वस्त करतानाच त्यांनी पाकिस्तानला कठोर इशाराही दिला आणि संपूर्ण जगाला भारताची ठाम भूमिका ठणकावून सांगितली.

 

दहशतवादाच्या विरोधात भारताची कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील तसंच अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भारत अजिबात भीक घालणार नाही; असं त्यांनी सांगितलं.