डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘ऑपरेशन सिंदूर’ ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरुद्ध केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केलं. ते आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यासाठी श्रीनगर इथे पोहोचल्यानंतर संरक्षण दलांना संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. संरक्षण मंत्री आणि देशाचा नागरिक म्हणून मी तुमचे आभार मानतो, अशा शब्दांत सिंह यांनी संरक्षण दलांचं कौतुक केलं. संपूर्ण देशाच्या शुभेच्छा, आशीर्वाद पोहोचवण्यासाठी आपण इथे आलो आहोत. ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नसून ती आपली देशाच्या संरक्षणाप्रति असलेली वचनबद्धता आहे, असं सांगताना सिंह म्हणाले.

 

यावेळी, सिंह यांनी श्रीनगरमधल्या लष्कराच्या १५व्या कॉर्प्स मुख्यालयालाही भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि घडामोडींच्या सर्व पैलूंबद्दल माहिती घेतली.