ऑपरेशन सिंदूरला उद्योग क्षेत्राचा पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रसरकारनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला देशातल्या उद्योग क्षेत्रानं पाठिंबा दिला आहे. ही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आवश्यक कृती होती आणि देशातलं उद्योगक्षेत्र सरकारच्या पाठिशी आहे असं CII, अर्थात भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी सांगितलं. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात उद्योगक्षेत्राचं सरकारला समर्थन आहे,असं ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.