डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 8, 2025 8:21 PM

printer

सर्वपक्षीय बैठकीत ऑपरेशन सिंदूरचं एकमुखी समर्थन

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, संयुक्त जनता दल आदी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. 

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदुरमागची भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाविरोधातल्या लढाईत सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याची ग्वाही उपस्थित नेत्यांनी बैठकीत दिली. या बैठकीत सर्व पक्षांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन करून या कारवाईचं एकमतानं समर्थन केलं, असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा