ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण आहे, असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज सिकंदराबाद इथं संरक्षण व्यवथापन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. सशस्त्र दलांमध्ये एकत्र कृतीसाठी आवश्यक धोरणात्मक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या रुपरेषेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. याशिवाय सध्याच्या तंत्रज्ञानावर आधारित युगात व्यापक क्षमता विकास, आत्मनिर्भरता आणि संरक्षण क्षेत्रातल्या परिवर्तनात्मक बदलांचं ज्ञान असणं ही काळाची गरज आहे, असं ते म्हणले.
Site Admin | August 10, 2025 2:10 PM | operation sindoor
‘ऑपरेशन सिंदूर’ हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण – संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान
