डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागरिकांचं संरक्षण करण्याचा भारताचा अधिकार आता संपूर्ण जग मान्य करत आहे- संरक्षणमंत्री

दहशतवादापासून आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्याचा भारताचा अधिकार आता संपूर्ण जग मान्य करत आहे, असं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केलं. ते आज गोव्यात आयएनएस विक्रांतवर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्ताननं स्वतःच्या हातांनी त्यांच्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादाची समूळ नष्ट करायला हवीत, तसंच हाफिज सईद आणि मसूद अझहर सारख्या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.