ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये उच्चस्तरीय बैठका घेत आहेत.
संजयकुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने इंडोनेशियातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या नेतृत्वाशी संवाद साधला आणि दहशतवाद विरोधातील भारताच्या शून्य सहनशक्ती धोरणाबाबात चर्चा केली. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पनामात भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या बैठकीत दहशतवाद विरोधात भारत कठोर धोरणांचा अवलंब करत असल्याचं अधोरेखीत केलं. यापुढेही जशास तसे उत्तर भारताकडून दिले जाईल असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ २७ तारखेपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने दक्षिण आफ्रिकेच्या उपमंत्र्यांना भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली तसंच केपटाऊनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपा खासदार बैजयंत पांडा यांनी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांची भेट घेतली. पहेलगाम हल्ल्याच्या वेळी सौदी अरेबियाच्या राजकीय नेतृत्वाने दिलेल्या पाठिंब्याबद्द्ल त्यांनी आभार मानले. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील भेटीनंतर सिएरा लिऑन या देशात पोहचलं आहे.