गेल्या दोन वर्षांत अग्निपथ योजनेंतर्गत भरती करण्यात आलेल्या तीन हजार अग्निवीरांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांनी पाकिस्तानी क्षेपणास्त्रं आणि ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
हवाई संरक्षण दलात तैनात असणाऱ्या दोनशेहून अधिक अग्निवीरांनी पश्चिम आघाडी धैर्यानं आणि दृढनिश्चयानं सांभाळली. त्यांनी पेचोरा, शिल्का, ओएसके -एके क्षेपणास्त्रं आणि मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं प्रणाली चालवली.
तसंच त्यांनी संपर्क व्यवस्था आणि आकाश आणि इतर क्षेपणास्त्रं वाहून नेण्यासाठी आणि डागण्यासाठी वापरली जाणारी वाहनं चालवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.