डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळं रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणांतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देईल. रवाना होण्यापूर्वी संजय झा यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. 

 

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळही आज रवाना होणार आहे. हे शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती, काँगो, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांना भेट देईल. 

 

या धोरणांतर्गत एकूण सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं ५ जूनपर्यंत ३२ देशांना भेट देऊन भारताची भूमिका समजावून सांगणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा