डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य करण्याचं सामर्थ्यं दाखवून दिलं

तीनही सैन्यदलांच्या योग्य समन्वयातून, धोरणात्मक सखोलता दर्शवत आणि तांत्रिक वर्चस्वाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा होता असं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनं सैन्यदलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दीष्ट साध्य करण्याचं सामर्थ्यं दाखवून दिलं.

 

सध्याच्या बहुस्तरीय युद्धपद्धतीच्या काळात भारताच्या लष्करानं आपली एकतेची ताकद आणि धोरणात्मक दृष्टीकोन यांच्या बळावर नियंत्रण रेषेसह पाकिस्तानच्या अंतर्गत भागातली दहशतवाद्यांची आश्रयस्थानं उद्ध्वस्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं सविस्तर तरीही अचूक नियोजन करुन आणि बौद्धिक सामर्थ्याचा वापर करुन सामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोहोचेल अशा रितीनं उत्तर दिलं.