डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘ऑपरेशन सिंदूर’ चं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक

भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ चं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे.

 

पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्घृण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जगानं दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स धोरण दाखवलं पाहिजे असं मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच राज्यमंत्री एल मुरुगन यांनीही या मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्याला भारतीय लष्कराचा अभिमान आहे असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. काँग्रेस दहशतवादाविरोधात कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

 

भारतीय सैन्याचा आपल्याला अभिमान असून ऑपरेशन सिंदूरद्वारे सैन्यानं केलेली कामगिरी अतुलनीय आहे तसचं पहलगाम इथं दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना ही खरी श्रद्धांजली असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे आणि आज तोच विश्वास सार्थ ठरवत भारतीय हवाई दलानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला अशी प्रतिक्रिया माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी दिली. पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बोलून आपल्या भावना व्यक्त केल्या. दहशतवादाचा पूर्णपणे बीमोड करणं आवश्यक असल्याचं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी संरक्षण दलांचं कौतुक केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा