डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरवरील भारताच्या राजनैतिक संपर्कासाठी स्थापन केलेल्या सातपैकी पहिले सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज चार देशांना रवाना होत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युएई, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि सिएरा लिओनला रवाना होईल. गुरुवारी खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान आणि सिंगापूरला रवाना होईल तर द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ही शिष्टमंडळे दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेची भारताची भूमिका मांडतील. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्लीतील संसद भवनात शिष्टमंडळातील सदस्यांना माहिती दिली. सर्व शिष्टमंडळे पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत एकंदर 32 देशांना भेट देतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा