भारतानं ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेला ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं

ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत दितवा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला भारतानं ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं आहे. भारतीय नौदलाच्या दोन नौकांमधून साडेनऊ टन धान्य श्रीलंकेत पोहोचवण्यात आलं आहे. याशिवाय, तंबू, पांघरुणं, तयार अन्नपदार्थ, औषधं, वैद्यकीय साहित्य यासह आणखी साडे एकतीस टन मदत साहित्य, भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांद्वारे पाठवण्यात येणार आहे. तसंच एनडीआरएफ, यूएसएआरच्या पथकांसह चातक हेलिकॉप्टर्सद्वारे व्यापक मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत दीडशेपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. आत्तापर्यंत २ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना हवाईमार्गाने मायदेशी परत आणलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.