भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडचा “ऑपरेशन सद्भावना” हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा आहे. असा विश्वास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. मुंबईतल्या राजभवन इथं “ऑपरेशन सद्भावना” उपक्रमांतर्गत आयोजित नॅशनल इंटीग्रेशन टूर अंतर्गत सिक्कीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबर राज्यपालांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमात सिक्कीम मधील युवक-युवतींच्या सक्रिय सहभागामुळे देशाच्या समावेशक आणि ऐक्यपूर्ण भविष्यासाठी नवसंजीवनी मिळेल असंही ते यावेळी म्हणाले.
Site Admin | July 22, 2025 7:36 PM | CP Radhakrishnan | Operation Sadbhavana
“ऑपरेशन सद्भावना” हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा-राज्यपाल
