हरवलेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कानअंतर्गत आत्तापर्यंत ४१ हजार १९३ लहान मुलांचा, तर ऑपरेशन शोधअंतर्गत गेल्या वर्षी १७ एप्रिल ते १५ मार्च या कालावधीत ४ हजार ९६० महिला सापडल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
आमदार सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांमध्ये अनेक वेळा अशा प्रकरणांचा तपास मागे पडू नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात शोध कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, असंही फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारच्या Missing Portalशी सगळ्या राज्यांना जोडण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले. यावर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, याकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित केली.