बांग्लादेशामध्ये कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं परवानगी दिली आहे. भारतातून पाठवण्यात आलेली १५० टन कांद्याची पहिली खेप काल दुपारी बांगलादेशात पोहोचली. २९ टन भारतीय कांद्याची शेवटची खेप २ मार्च रोजी बांग्लादेशात पाठवण्यात आली होती. स्थानिक कांद्याच्या किमतीत घसरण तसंच भारतीय कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे आयात थांबवण्यात आली.
Site Admin | August 18, 2025 2:33 PM | Onion Export
भारतातून कांद्याची आयात करायला बांगलादेश सरकारची परवानगी
