October 3, 2025 9:36 AM | Onion Market Price

printer

नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव, जाणून घ्या काय आहेत दर?

विजयादशमीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील उमराणे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तसंच खारीफाटा इथल्या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केटमध्ये सर्वोच्च 5 हजार 555 रुपये, तर उमराणे बाजार समितीत सर्वोच्च 5 हजार 100 रुपये बाजारभाव मिळाला.