January 6, 2026 1:40 PM

printer

आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या गॅस गळतीनंतर ONGC च्या तज्ज्ञांचं पथक मुंबई आणि दिल्ली इथून रवाना

आंध्रप्रदेशमध्ये कोनासीमा जिल्ह्यात ONGC च्या तेल विहिरीतून  झालेल्या गॅस गळतीनंतर लागलेली आग विझवण्यासाठी आज ONGC  च्या तज्ज्ञांचं पथक मुंबई आणि दिल्ली इथून रवाना झालं. मोरी आणि इरुसुमांडा या गावांजवळच्या या तेल विहिरीतून काल गॅस गळती झाली. त्यानंतर  जवळजवळ २० मीटर उंच आणि २५ मीटर रुंदीचा आगीचा झोत उसळला.  

 

आग विझवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु असून, अग्निशमन दल, पोलीस दल, ओएनजीसी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि रेडक्रॉस चे कर्मचारी कालपासून या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती कोनासीमाचे सह जिल्हाधिकारी टी निसंथी यांनी पीटीआय या  वृत्तसंस्थेला दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.