कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेची सुरुवात

कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेची सुरुवात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळमध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या २४ लाख ८७ हजार ३७५ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार आहे. सहकारी यंत्रमाग संस्था आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आलं असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचं, संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं.