‘एक देश एक निवडणूक’ हा देशासाठी महत्त्वाचा मुद्दा – मंत्री किरेन रिजीजू

एक देश एक निवडणूक हा देशासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथे आज ते वार्ताहरांशी बोलत होते. हा मुद्दा कोणत्याही पक्षासाठी किंवा कोणत्याही व्यक्तिसाठी नसून तो देशाच्या हितासाठी आहे. देशात निवडणुका या देश आणि त्या देशाच्या नागरिकांच्या हितासाठी घेतल्या जातात, असंही रिजीजू यावेळी म्हणाले. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवळपास २० वर्षं देशात एकाच वेळी निवडणुका झाल्या. मात्र काँग्रेसने कलम ३५६चा गैरवापर केल्यामुळे संसद आणि राज्य विधानसभांच्या स्वतंत्र निवडणुका घेतल्या गेल्या, अशी टीकाही रिजीजू यांनी केली.