डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘एक देश एक निवडणूक’ साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक ८ जानेवारीला होणार

‘एक देश एक निवडणूक’ साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक येत्या ८ जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ खासदार पी पी चौधरी यांच्या अध्यधतेखाली होणारी ही बैठक प्रास्ताविक स्वरुपाची असणार आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रतिनीधी समितीच्या ३९ सदस्यांना या दोन्ही विधेयकांबद्दल माहिती देतील. संविधान सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक गेल्या मंगळवारी लोकसभेत सादर करण्यात आलं आणि गेल्या शुक्रवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं.