डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण, तीन जखमी

जम्मू आणि काश्मीरमध्ये, किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम जंगल भागात दहशतवाद्यांशी काल झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा कनिष्ठ अधिकाऱ्यानं प्राणाची आहुती दिली. तर या चकमकीत तीन जवानही गंभीर जखमी झाले. दोन ग्राम संरक्षण रक्षकांची हत्या झाल्यानंतर गुप्तचर माहितीच्या आधारे किश्तवाडमधील भरत रिजच्या भागात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली. या परिसरात तीन ते चार दहशतवादी असल्याची शक्यता वर्तवली जात असून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. दरम्यान, काल संध्याकाळी श्रीनगर जिल्ह्यातील झाबरवान जंगल परिसरात आणखी एक संयुक्त दहशतवादविरोधी मोहीम संपली. तर बारामुल्ला जिल्ह्यातील राजपुरा सोपोर भागात काल झालेल्या कारवाईत एक अज्ञात दहशतवादी मारला गेला, असं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.