पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘एक भारत-एक तिकीट’

एक भारत एक तिकीट उपक्रमासाठी भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन महामंडळ म्हणजे आयआरसीटीसी आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश वाहतूक महामंडळ म्हणजे एनएसआरटीसी यांनी संयुक्त सहकार्य केलं आहे. त्या अंतर्गत भारतीय रेल्वे आणि नमो भारत रेल्वेंची तिकीटं बुक करता येणार आहेत. आयआरसीटीसी संकेतस्थळावरून नमो भारत तिकीटं बुक करण्याची मुभा मिळणार असून, ती रद्द करणं आणि पैसे भरणं यांच्यासाठी अनेक पर्याय देण्यात येणार आहेत. नमो भारत रेल्वेचं तिकीट बुक करण्यासाठी प्रवासी एक क्यूआर कोड तयार करू शकतील आणि तो चार दिवस वैध असेल, असंही नमूद करण्यात आलं आहे.