पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारोजण जमले आहेत. शहर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आज भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन केलं. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती हा संघर्ष जिवंत असल्याचे निदर्शक आहे असं ते या वेळी म्हणाले. भिमा कोरेगाव लढाईतला प्रत्यक्ष संघर्ष संपला असला तरी मानसिक संघर्ष अद्याप सुरूच आहे आणि तो संपेपर्यंत मानवतेच्या प्रतिकांना अभिवादन करायला माणसं जमतील अशी आपली भावना असल्याचं त्य़ांनी सांगितलंय.
Site Admin | January 1, 2025 2:19 PM
पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारोंची गर्दी
