डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 14, 2024 10:00 AM | Minister Kiren Rijiju

printer

26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार

26 नोव्हेंबर रोजी संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.

 

ते काल महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्यात येणार असल्याचं रिजीजू म्हणाले. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहनही रिजीजू यांनी केलं.