लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज हरियाणाच्या मानेसार इथं पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घघाटन केलं. या परिषदेला सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशाचे अध्यक्ष उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्दिष्ट राष्ट्र निर्माण आणि संविधानिक लोकशाहीच्या बळकटीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका हे आहे. देशाच्या वाढत्या शहरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्त्वही या परिषदेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात येणार आहे.