इजिप्तमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिंपिकपटू गुरप्रित सिंग यानं पुरुषांच्या 25 मीटर पिस्तुल गटात रौप्य पदक पटकावलं. जागतिक स्पर्धेतलं गुरप्रितचं हे दुसरं रौप्यपदक आहे.
त्यानं 2008 मध्ये 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तुल गटात रौप्यपदक मिळवलं होतं. इजिप्तमधील जागतिक स्पर्धेत तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कास्य अशी एकूण 13 पदकं मिळवत भारतानं पदकतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे.