January 23, 2025 8:28 PM | Ola | Uber

printer

ॲन्ड्रॉइड आणि आयफोनच्या प्रवाशांना वेगळं भाडं आकारण्याबद्दल ओला आणि उबरला नोटिसा

ॲन्ड्रॉइड आणि आयफोनच्या प्रवाशांना इतरांपेक्षा वेगळं भाडं आकारण्याबद्दल केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं ओला आणि उबरवर नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून ही नोटीस बजावण्यात आली असून त्याबद्दल ऑनलाईन प्रतिसाद मागवल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितलं.