तेलाच्या किमतींमध्ये ५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण

कतारमधील अल उदेद अमेरिकन हवाई तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये पाच वर्षांतील सर्वांत मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली गेली. तेलाच्या किमती प्रति बॅरल पाच डॉलर्सने घसरल्या. ऊर्जा पायाभूत सुविधांना थेट धोका नसल्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी असल्याची खात्री पटल्यानं व्यापाऱ्यांनी आठवड्याच्या शेवटी तेलाची विक्री केल्यानं किमतीत मोठी घसरण झाली.