डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 23, 2025 3:08 PM | Oil prices

printer

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात आज वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत दोन टक्क्यानी वाढून ७९ डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलची किंमत ७५ डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. गेल्या पाच महिन्यातली ही सर्वोच्च वाढ आहे. मध्य आशियामधे सुरू असलेल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. इराणने जगातला सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुजच्या समुद्रधुनीला बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तेलाच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा