पेट्रोलच्या उत्पादनात वाढ झाल्यानं ओपेक प्लस या पेट्रोल निर्यातदार राष्ट्रांच्या गटानं नोव्हेंबर महिन्यापासून तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाचा भाग असलेल्या रशिया आणि इतर लहान उत्पादकांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ओपेकनं आपल्या तेलाच्या उत्पादनाच्या प्रमाणात या वर्षीपासून वाढ केली असून ते प्रतिदिन २६ लाख बॅरल्स इतकं केलं आहे. हे प्रमाण जागतिक मागणीच्या अडीच टक्के इतकं आहे.
Site Admin | October 5, 2025 7:43 PM | Oil Output | OPEC
तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा OPEC+चा निर्णय