सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना विद्यार्थ्यांच्या निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.
पौष्टिक अन्न आणि व्यायामावर भर देणारे उपक्रम यांच्यावर भर देण्याचे निर्देशही सीबीएसईने शाळांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. तसंच, शाळांमध्ये जिन्यांचा वापर, दोन तासांमध्ये छोटी व्यायामाची विश्रांती आणि चालण्याच्या व्यायामाचा समावेश वेळापत्रकांमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.