ओदिशामध्ये, पुरी इथं आज भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध ‘बहुडा यात्रा’ सुरु आहे. आपलं जन्मस्थान असलेल्या गुंडीचा मंदिरात एक आठवडा मुक्काम केल्यावर या देवता आपल्या रथातून १२ व्या शतकातल्या श्री जगन्नाथ मंदिरामध्ये परततील. विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यावर दुपारी या देवतांची ‘पहाडी’, म्हणजेच मिरवणूक सुरू झाली. पुरीचे राजा गजपती महाराजा दिव्य सिंह देब दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान ‘छेरा पहानरा’ म्हणून ओळखली जाणारी रथांची औपचारिक सफाई करतील आणि त्यानंतर तिन्ही रथांना घोडे जोडले जातील. रथ ओढण्याचा सोहळा दुपारी ४ वाजता सुरु होईल. रथयात्रेच्या पूर्वसंध्येला काल श्री गुंडीचा मंदिरात ‘संध्या दर्शन’ विधीच्या वेळी हजारो भाविकांनी देवतांचं दर्शन घेतलं. ‘बहुडा यात्रेसाठी स्थानिक प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
Site Admin | July 5, 2025 3:33 PM | Bahuda Yatra | Odisha | Puri
भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध ‘बहुडा यात्रा’ सुरु
