ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआ या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारल्यानं भारताचं सुवर्णपदक निश्चित झालं आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात उन्नती हिनं तसनीम मीर हिच्यावर १८-२१, २१-१६, २१-१६ असा विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात इशाराणीनं तन्वी हिरेमठ हिच्यावर १८-२१, २१-७, २१-७ अशी मात केली. पुरुष एकेरीत किरन जॉर्ज यानं रौनक चौहानवर २१-१९, ८-२१, २१-१८ असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. आता त्याचा अंतिम सामना इंडोनेशियाच्या मुहम्मद युसुफ याच्याशी होणार आहे.
Site Admin | December 13, 2025 8:44 PM | Badminton
ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआची अंतिम फेरीत धडक