ओडिशातल्या बालासोर मध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींनं प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला. 95 टक्के जळलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेऊन या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. पोलिसांनी आरोपीसह,महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ही ताब्यात घेतलं आहे.