गुजरातमधल्या वडोदरा इथं उद्यापासून सुरु होणार असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला न्युझीलंडविरुद्धचा पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. रोहित शर्मा तसंच विराट कोहली या दिग्गज फलंदाजांचं भारतीय संघात होणार असलेलं पुनरागमन, हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरणार आहे. हे दोन्ही मातब्बर फलंदाज एकदिवसीय सामन्यातली त्यांची उत्कृष्ट कामगिरी कायम राखण्यासाठी तसंच आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघातलं स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असणार आहेत.
Site Admin | January 10, 2026 8:21 PM
न्युझीलंडविरुद्धचा पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज